ERP चे अर्थ आणी व्यवसाय संस्थेतील महत्व

ERP चे व्यवसाय संस्थेतील महत्व (The importance of ERP in business organization)

ERP हे उत्पादन व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कंपनीच्या कामकाजामध्ये ग्राहकांकडून आदेश मिळविण्यापासून उत्पादन आणि विक्री व उत्पन्न मिळविण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणता आल्या आहेत. त्यामुळे ERP ला Back Office Software असे संबोधले जाते. परंतु त्यामध्ये विक्री, वितरण व्यवस्था, ग्राहकसंबंध व्यवस्थापन इत्यादींचाही समावेश होतो. ERP पद्धतीमुळे व्यवसायाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. ERP प्रणाली खालील कारणांमुळे महत्त्वाची ठरते.

अर्थ

ERP ही एक अशी संगणकीय प्रणाली आहे की, ज्यामुळे व्यवसायाची स्वयंचलित प्रतिकृती निर्माण करतो, ज्या मध्ये वित्तपुरवठ्यापासून कारखान्यातील उत्पादन स्तरापर्यंत व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांची एकात्मिक माहिती संगणकीय प्रणालीमुळे त्यातील क्लिष्टता कमी केली जाते.

प्रारंभीच्या काळात ERP संगणकीय प्रणालीचा उद्देश निर्मिती उद्योग व त्यातील मुख्य कार्ये म्हणजे विक्री व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, हिशेब लेखन व वित्तीय व्यवहार इ. कार्यांचे नियोजन व व्यवस्थापन करणे असा होता. परंतु सद्य:स्थितीत सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायामध्ये व विविध प्रकारच्या कार्याचे व क्रियांचे नियोजन करण्यासाठी या संकल्पनेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो.

ERP चे व्यवसाय संस्थेतील महत्व

ERP हे उत्पादन व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कंपनीच्या कामकाजामध्ये ग्राहकांकडून आदेश मिळविण्यापासून उत्पादन आणि विक्री व उत्पन्न मिळविण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणता आल्या आहेत. त्यामुळे ERP ला Back Office Software असे संबोधले जाते. परंतु त्यामध्ये विक्री, वितरण व्यवस्था, ग्राहकसंबंध व्यवस्थापन इत्यादींचाही समावेश होतो. ERP पद्धतीमुळे व्यवसायाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. ERP प्रणाली खालील कारणांमुळे महत्त्वाची ठरते.

१. सर्व प्रकारच्या व्यवसायांना उपयुक्त.

२. स्पर्धेतील बदल.

३. व्यावसायिक भागीदारांना अधिक स्पर्धात्मक बनविले आहे.

४. नफ्यात वाद.

५. व्यवसाय प्रक्रियेच्या पुनर्बाधणीचे साधन.

६. व्यवसाय प्रक्रियेतील चांगल्या पद्धती.

७. ERP मुळे व्यवसाय स्वरूपात बदल.

 

ERP चे व्यवसाय संस्थेतील महत्व सविस्तरपणे खलील प्रमाणे आहेत.

१. सर्व प्रकारच्या व्यवसायांना उपयुक्त :

ERP प्रणाली ही सर्व प्रकारच्या व्यवसायांना उपयुक्त ठरते. जरी त्या व्यवसायाचा आकार लहान असो अथवा मोठा असो, कोणताही उत्पादन वस्तू प्रकार असो आणि व्यवसायाचे स्वरूप कोणतेही असो, या सर्व प्रकारच्या व्यवसायांना व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून व्यवसायाची कार्यक्षमता व स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली आहे. तसेच व्यवसायातील विविध क्रिया व प्रक्रिया या स्वयंचलित, दररोज ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

२. स्पर्धेतील बदल:

ERP मुळे व्यवसायाची व्यूहरचना व प्रक्रिया स्पर्धात्मक दृष्टीने बदलणे भाग पडले आहे. या प्रणालीमुळे व्यवसायाचा स्पर्धात्मक फायदा वाढून व्यवसायमूल्य वाढविले आहे. योग्य प्रकारे ERP प्रणाली राबविल्यामुळे स्पर्धेच्या युद्धातील स्पर्धकाला हरविण्यासाठी व्यूहरचनात्मक शस्त्र म्हणून वापरून स्पर्धकाला हरविणे शक्य झाले आहे. तसेच व्यवसायामध्ये आवश्यक ते योग्य बदल करून व्यवसायाला अद्ययावत ठेवता येते. ERP मुळे स्पर्धकांना ही प्रणाली न राबविल्यास व्यवसाय करणे कठीण बनले आहे.

३. व्यावसायिक भागीदारांना अधिक स्पर्धात्मक बनविले आहे.

ज्या व्यवसाय संस्थांनी ERP प्रणाली राबविली आहे, त्या व्यवसाय संस्था अधिक कार्यक्षम झालेल्या आहेत. कारण ERP प्रणालीमुळे व्यवसाय संस्थांमधील विविध प्रक्रिया स्थर्यचलित बनवून त्यांना इतरांपेक्षा अद्ययावत बनविले आहे. या प्रणालीमुळे व्यवसायातील माहिती तत्काळ निर्णयांना जलदगतीने मिळते. या वाढलेल्या गतीने आणि कार्यक्षमतेने व्यावसायिक भागिदारांवर दबाव वाढवून त्यांना ही प्रणाली राबविण्यासाठी क्रमप्राप्त बनवावे,

४. नफ्यात वाद :

जी व्यवसाय संस्था ERP प्रणाली विविध प्रकारची सेवा उपलब्ध करून देते. त्यांना या सेवा विविध प्रकारच्या व्यवसाय प्रक्रियेत पुनर्वाधणी, योग्य ERP पॅकेज, अंमलबजावणी, वापरदारांना प्रशिक्षण, अंमलबजावणीनंतरची साहाय्यक सेवा. इत्यादी ERP प्रणालीच्या सेवांचा व्यवसाय संस्थांना मोठा फायदा मिळतो, चांगला अनुभव मिळतो आणि अधिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन इ. ERP प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे होते. या सर्वांचा परिणाम म्हणून व्यवसायाची कार्यक्षमता वाढवून नफा वाढण्यामध्ये रूपांतर होते.

५. व्यवसाय प्रक्रियेच्या पुनर्बाधणीचे साधन :

व्यवसाय प्रक्रियेची पुनर्बाधणी/ रचना करण्यासाठी ERP प्रणाली हे साधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. ERP हे पुनर्रचनेचे एक प्राथमिक साधन आहे, की ज्यामुळे व्यवसायातील विविध प्रक्रिया करताना योग्य मार्गदर्शन मिळते. पुनर्बाधणीच्या कामाचे नियोजन, वेळापत्रक आणि नियंत्रण करणे सोपे जाते. परिणामी पुनर्रचनेला मूर्तस्वरूप देता येते.

६. व्यवसाय प्रक्रियेतील चांगल्या पद्धती :

व्यवसाय प्रक्रियेतील चांगल्या पद्धती मोजणे, दीर्घकाळ फायदे देणारे आणि व्यवसायातील कामात सुधारणा करण्यासाठी ERP प्रणालीचा उपयोग होतो. ERP प्रणालीमुळे व्यवसायातील विविध क्रियांचे योग्य प्रकारे

नियोजन करता येते, नियंत्रण प्रभावी बनते, तसेच ही प्रणाली चांगल्या पद्धतीवर आधारित असल्याने व्यवसाय प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येतात.

७. ERP मुळे व्यवसाय स्वरूपात बदल :

ERP मुळे व्यवसायातील माहिती प्रणाली पद्धतीची जागा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी घेतल्यामुळे व्यवसायाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे व्यवसायातील कर्मचारी अधिक गतिमान बनले आहेत. ERP मुळे व्यवसायाच्या विविध प्रकारच्या गरजाही बदलल्या आहेत. याचा परिणाम म्हणून निर्मिती क्षेत्रातील, कार्यात्मक क्षेत्रातील कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना व व्यावसायिक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Article

28 बिझिनेस IDEA IN MARATHI | SMALL BUSINESS IDEAS IN MARATHI

Small Business Ideas In Marathi For Ladies (महिलांनसाठी / Housewife)

ग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village business ideas in Marathi

 

Leave a Comment